प्रतिनिधी/ गोडोली
किल्ले अजिंक्यतायाच्या परिसरातील मंगळाई मंदिराजवळ जाळी लावून सशाची शिकार करणाया महेश आप्पाराव सोवळकर (वय -29)रा.गोळीबार मैदान,गोडोली आणि जगन्नाथ रामचंद्र निंबाळकर (वय-50) रा.विलासपूर यांना वनक्षेत्रपाल शीतल राठोड आणि त्यांच्या टीमने गुरुवारी रात्री 7 च्या सुमारास रंगेहाथ ताब्यात घेतले.
लाँकडाऊनच्या काळात वनविभाग अधिक सतर्क झाला आहे. गुरुवारी किल्ले अजिंक्यतायाच्या परिसरात जाळी लावून सशाच्या शिकारीसाठी काही जण गेल्याची गोपनीय खबर मिळताच वनक्षेत्रपाल शीतल राठोड आपल्या कर्मचायांसमवेत परिसरात पोहचल्या.तिथे मालकी क्षेत्रात नाँयलाँन दोरीच्या जाळीत अडकला वन्यप्राणी सशा आढळून आला. दरम्यान दोन संशयास्पद हालचाल करणायांना ताब्यात घेतले असता त्यांनी शिकार करण्याच्या उद्देशाने जाळी लावल्याचे कबूल केले.
वनाधिकायांनी दोन्ही इसम यांना ताब्यात घेऊन वनकोठडीत ठेवले असून उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक विश्वास भडाळे यांच्या मार्गदर्शना खाली वनक्षेत्रपाल शीतल राठोड, वनपाल सुहास भोसले, वनरक्षक योगेश गावित (परळी), संजय धोंडवड ( कण्हेर), प्रशांत पडवळ (भरतगाव), संतोष काळे (खडगाव), मारुती माने (रोहोट), राजकुमार मोसलगी (ठोसेघर), रणजित काकडे (पळसावडे), धनंजय लादे,संतोष दळवी (वाहन चालक)हे कारवाईत सहभागी झाले होते.