शाहूवाड़ी/प्रतिनिधी
शाहूवाडी तालुक्यातील तळवडे अंबा या ठिकाणी असलेल्या घनदाट जंगलात विना परवाना बंदूकीच्या माध्यमातून वन्यप्राणी पिसोरी याची शिकार करून मांस वाटून घेत असताना वनविभागाच्या पथकाने धाड टाकून तीन संशाहित आरोपी सह चार चाकी गाडी, बंदूक, शिकारीचे साहित्य असे मिळून दोन लाख पन्नास हजाराचा मुदेमाल वन विभागाच्या पथकाने जप्त केला आहे. एक संशाहित आरोपी फरारी आहे.
सदर आरोपींना न्यायालयाने तीन दिवसाची वनकोठडी सुनावली आहे. अटक केलेल्या संशाहित आरोपीची नांवे पुढीलप्रमाणे सुनील सिताराम हातणकर वय ४४, रा. तळवडे दिपक दत्ताराम तावरे, वय ३४, गणपत सिताराम मोळे वय ६०. रा. दोघे केर्ले संदीप शामराव जाधव रा. केर्ले हा फरार झाला आहे.
वनविभागा कडून मिळालेली महिती अशी , गुरुवार दि ७ एप्रिल रोजी पहाटे केर्ले – तळवडे येथील सुनील हातणकर , दिपक तावरे, गणपत मोळे. संदीप जाधव असे चार जण ( ए्म एच 02 बी टी १३१४ ) या चार चाकी गाडीतुन विनापरवाना बंदूक घेऊन आंबा जंगलात शिकारी साठी गेले होते . जंगलात गेल्यावर विना परवाना बंदू कीतुन पिसोरी वन्य प्राण्याची शिकार केली. शिकार केल्यावर तळवडे येथील सुनील हातणकर यांच्या राहत्या घरातील परडयात शिकार केलेल्या प्राणी कापून त्याचे मांस वाटून घेत असताना खब ऱ्या कडून वनविभागाच्या वरिष्ठ अधि कार्यांना या घटनेची महिती मिळाली होती .वनविभाचे सहायक वनसरक्षक सुनील निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने सुनील हातण कर याच्या घरावर धाड टाकली असता रंगेहात विना परवाना बंदूक , कोयता . सुरा , विळा , मटण , कुंटणी सह चार चाकी गाडी असे मिळून दोन लाख पन्नास हजार रुपयाचे सहित्य वनविभागाच्चा पथकाने जप्त केले. चार संशाहित आरोपीना ताब्यात घेऊन आज शाहूवाडी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दि ९ एप्रिल पर्यत तीन दिवसाची वन कोठडी सुनावली आहे. फरारी संदीप जाधव याचा शोध वनविभागाचे कर्मचारी घेत आहेत.