हरणाचे शिंग, बंदूक, जीवंत काडतुसे, चाकू जप्त, नेहरुनगर येथे टाकली धाड
प्रतिनिधी/ बेळगाव
कित्तूर येथील राखीव जंगलात हरणाची शिकार करण्यासाठी गोळय़ा झाडल्याच्या आरोपावरुन 27 डिसेंबर रोजी रात्री गोल्याळी विभाग वनाधिकाऱयांनी दोघा जणांना अटक केली होती. त्या दिवशी फरारी झालेल्या नेहरुनगर येथील एका शिकाऱयाच्या घरावर सोमवारी सकाळी छापा टाकण्यात आला.
नेहरुनगर येथील मेहमुदअली खान (वय 50) हा फरारी झाला आहे. सोमवारी सकाळी 6 वाजता त्याच्या घरावर छापा टाकून अधिकाऱयांनी तपासणी केली. नागरगाळी एसीएफ सी. जी. मिरजी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. प्रशिक्षणार्थी एसीएफ चंद्रशेखर पाटील, गोल्याळीचे आरएफओ श्रीकांत कडोलकर, बेळगावचे आरएफओ शिवानंद मगदूम, संजय मगदूम, माधुरी दळवाई, विनय गौडर, अजिज मुल्ला, गिरीश मेक्केद, प्रवीण धुळय़ाप्पगोळ, मोहम्मद किल्लेदार, नवीन हंचीनमनी आदींनी या कारवाईत भाग घेतला.
अधिकाऱयांनी मेहमुदअली खानच्या घरातून एक हरणाचे शिंग, टेलीस्कोप असलेली 0.315 रायफल, दोन चाकू, एक रायफल टेलीस्कोप, हॅलोजन रिचार्जलेबल लाईट, हायफोकस लाईट, दोन वॉकीटॉकी, दुर्बिण, 26 बार बोरची जीवंत काडतुसे, 7 रिकाम्या पुंगळय़ा, 8 एमएमचे 14 जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
मेहमुदअली खानला अटक करण्यासाठी सोमवारी सकाळी त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. आजही तो अधिकाऱयांना सापडला नसला तरी त्याच्या घरातून शिकारीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहेत. अबकारी विभागाच्या कारवाईच्यावेळी एपीएमसी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते. फरारी आरोपीच्या शोधासाठी प्रयत्न सुरू असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱयांनी सांगितले.