शाळा सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय : एसटी कर्मचाऱयांचीही तपासणी
जिल्हय़ात दोन दिवसांत वीस कोरोना पॉझिटिव्ह चौघांचा मृत्यू, सहाजणांना डिस्चार्ज 4,799 जण कोरोना मुक्त, सक्रिय रुग्णसंख्या 150
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली असल्याने व पूर्ण प्रवासी क्षमतेने एसटी सुरू झाली असल्याने एस. टी. कर्मचारी आणि माध्यमिक शिक्षकांच्या कोविड-19 टेस्ट जिल्हा व तालुकास्तरावर सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंगळवारी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत वीस पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर चौघांचा मृत्यू झाला, अशी माहिती देण्यात आली.
नववी ते अकरावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे शाळा सुरू करताना सर्व शिक्षकांची कोविड टेस्ट केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच पूर्ण प्रवासी क्षमतेने एसटी सुरू करण्यासाठी परवानगी दिली असल्याने एसटी कर्मचाऱयांच्याही कोरोना टेस्ट सुरू केल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली.
जिल्हय़ात 20 पॉझिटिव्ह, चौघांचा मृत्यू
जिल्हय़ात सोमवारी सात, तर मंगळवारी तेरा मिळून दोन दिवसात 20 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसेच सोमवारी कणकवली तालुक्मयातील सांगावे येथील एकाचा, तर भिरवंडे येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच मंगळवारी सावंतवाडी तालुक्मयातील मळगाव येथील एकाचा व कुडाळ तालुक्मयातील एकाचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांत चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने मृत्यू होणाऱया रुग्णांची संख्या 135 वर पोहोचली आहे.
दोन दिवसात 20 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या पाच हजार 90 झाली आहे. तसेच दोन दिवसांत सहाजणांना डिस्चार्ज दिला गेल्याने आतापर्यंत एकूण चार हजार 799 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्हय़ात 150 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती देण्यात आली.
जिल्हय़ातील सद्यस्थिती : नवीन पॉझिटिव्ह रुग्ण – 13, सद्यस्थितीतील सक्रिय रुग्ण – 150, उपचारासाठी जिल्हय़ाबाहेर गेलेले रुग्ण – सहा, कोरोनामुक्त झालेले रुग्ण – 4,799, एकूण मृत रुग्ण – 135, एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 5,090, पॉझिटिव्हपैकी चिंताजनक रुग्ण – आठ.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड – 339, दोडामार्ग – 264, कणकवली – 1586, कुडाळ – 1153, मालवण – 436, सावंतवाडी – 685, वैभववाडी – 143, वेंगुर्ले – 471, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – 13.
तालुकानिहाय कोरोना सक्रिय रुग्ण : देवगड – 8, दोडामार्ग – 11, कणकवली – 21, कुडाळ – 27, मालवण – 23, सावंतवाडी – 35, वैभववाडी – सात, वेंगुर्ले – 18.
तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू : देवगड – आठ, दोडामार्ग – तीन, कणकवली – 33, कुडाळ – 26, मालवण – 15, सावंतवाडी – 32, वैभववाडी – सात, वेंगुर्ले – 10, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – एक.
आतापर्यंतचे कोरोना तपासणी अहवाल : आरटीपीसीआर टेस्ट – तपासलेले आजचे नमुने 72 व एकूण नमुने 20,906. पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 3637. ऍन्टिजेन टेस्ट – आजचे नमुने 134 व एकूण नमुने 15,515, पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 1572. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात – आठ, ऑक्सिजनवर – चार, व्हेंटिलेटरवर – चार.