प्राथमिक शिक्षकांचे दि. 17 रोजी कौन्सिलिंग : बदल्यांसंदर्भात दुसऱयांदा कौन्सिलिंग
प्रतिनिधी /बेळगाव
प्राथमिक शिक्षकांचे दि. 17 रोजी कौन्सिलिंग होणार आहे. त्याबाबतच्या नोटिसही संबंधित शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. मात्र 15 टक्क्मयांहून अधिक शिक्षकांची कमतरता असलेल्या विभागातील शिक्षकांचे कौन्सिलिंग होण्याबाबत शक्मयता धूसर आहे. आधीच शिक्षकांच्या कमतरतेमुळे शिक्षणाचा बोजवारा उडाला असताना कौन्सिलिंग प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात दुसऱयांदा शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात कौन्सिलिंग होत आहे. कोरोना महामारीच्या काळात शिक्षकांच्या बदल्या रखडल्या होत्या. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातील विभागवार शिक्षकांच्या बदल्यांसाठी दि. 17 रोजी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात कौन्सिलिंग होणार आहे. मागील वेळी जिल्हय़ाबाहेरील व समन्वयिक बदल्या झाल्या होत्या. आता त्या त्या विभागातील शिक्षकांच्या ऐच्छिक बदल्या होणार आहेत.
बेळगाव आणि खानापूर तालुक्मयात अनेक शिक्षक बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, जिल्हय़ातील काही तालुक्मयात शिक्षकांची कमतरता 15 टक्क्मयांहून अधिक असल्याने तेथील शिक्षकांचे कौन्सिलिंग स्थगित करण्यात आले आहे. औनलाईन प्रणालीत तशी तरतूद असल्याने स्थानिक पातळीवर अधिकारीही हतबल आहेत. पण यापूर्वी आवश्यकतेनुसार अशी स्थगिती उठविण्यात आली होती. यावेळीही ती उठवावी, अशी शिक्षकांची मागणी आहे.
कौन्सिलिंगच्या दिवसापर्यंत याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. अनेक शिक्षकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यांना हुरहुर लागली आहे.
वरिष्ट पातळीवर होईल निर्णय
तालुक्मयातील काही शिक्षकांच्या विभागवार बदलीसाठी नोटिसा आल्या आहेत. परंतु, 15 हून अधिक पदे रिक्त असल्याने यावेळचे कौन्सिलिंग होणार नाही. वरि÷ पातळीवर निर्णय होईल.
– लक्ष्मण यक्कुंडी, गट शिक्षणाधिकारी, खानापूर