प्रतिनिधी/ शिये
“ओळखपत्राविना सेवा बजावताना शिक्षकांना अडचण” या मथळ्याची बातमी शनिवारी सकाळी तरुण भारत सोशल मीडिया वरून प्रसिद्ध झाली. या वृत्ताची तात्काळ दखल घेत करवीर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शंकर यादव यांनी तालुक्यातील शिक्षकांना दुपारी दोन वाजेपर्यंत तात्काळ ऑनलाईन ओळखपत्र दिली. ऑनलाईन ओळखपत्र आल्यानंतर सदर ओळखपत्राच्या प्रिंट शिक्षकांनी संबंधित गावातील ग्रामपंचायतीमध्ये काढून घेतल्या. सदर ओळखपत्रावर प्राथमिक आरोग्य विभागाच्या अधिकार्यांची सही व शिक्का असणार आहे. ओळखपत्र मिळाल्याने शिक्षकातून काम करण्यास कोणतीही अडचण येणार नाही.