वार्ताहर/पट्टणकुडी :
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञानदान करून सुसंस्कृत समाज व आदर्श नागरिक घडविण्याचे कार्य करावे, असे मनोगत चिकोडी शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी एम. एच. सोमण्णावर यांनी व्यक्त केले.
येथील सरकारी उच्च प्राथमिक केंद्र शाळेत आयोजित गुरुस्पंदन कार्यक्रमात ते बोलत होते. एम. एच. सोमण्णावर, आर. के. कांबळे आदींच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. स्वागत अजित बिरण्णावर यांनी केले. शिक्षणाधिकारी कार्यालयात उत्तम काम केल्याबद्दल विशाल सोनटक्के, मिस्त्राr यांचा सत्कार करण्यात आला. चिकोडी शिक्षक सोसायटीचे अध्यक्ष जी. एम. कांबळे, आर. के. कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी तालुका गौरवाध्यक्ष एन. एस. कांबळे, तालुका अध्यक्ष सुनील खड्ड, सी. बी. आरभावी, एस. जी. बागेवाडी, एस. एन. बेळगावी, जिल्हा गौरवाध्यक्ष धुपदाळ, पी. डी. मजलट्टी, एस. जी. मोमीन, बी. पी. कांबळे, ए. आर. कदम, संजीव चौगला, सीआरपी एस. ए. कुरळुप्पे, मोहन शितोळे, आर. बी. मुल्ला, एफ. वाय. इनामदार, ए. एम. चिगरे, तोळण्णावर, मस्के, व्हटकर यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.