प्रतिनिधी / कोल्हापूर
शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना अस्वस्थता जाणवत असल्याने त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. मंगळवारी कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्याने त्यांना टाकाळा येथील एका खासगी रूग्नालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता मी कोरोनाचे दोन डोस घेवूनही थोडे अस्वस्थ वाटू लागल्याने तपासणी केली असता तपासणीनंतर कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.तसेच यामुळे डॉक्टरांच्याकडून योग्य उपचार सुरू असून, माझी प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.