वार्ताहर / म्हैसाळ
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी लेखाधिकाऱ्यांकडे साकडे घालण्यात आले. शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन सादर करुन प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली. अधिकऱ्यांनी ही शिक्षक परिषदेच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही राज्यव्यापी संघटना असून, 35 जिल्हे आणि 35 महानगरांमध्ये संघटनेची व्याप्ती आहे. संघटनेकडे अनेक शिक्षक संपर्क करून आपल्या समस्या मांडण्यासाठी येतात. मात्र, आजातागायत त्यांच्या एकही समस्या सोडविल्या नाहीत. वारंवार निवेदने देऊन आंदोलने करण्यापेक्षा समन्वयाने शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.