प्रतिनिधी/ सातारा
जिह्यातील सहकारी संस्थांमध्ये निवडणुकांचे वेध लागले होते. कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांची मुदतवाढ मिळालेली होती. निवडणुका कधी लागतील याच्याच प्रत्यक्ष इच्छुक आणि सभासद होते. जिह्यातील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेसह इतर सहकारी संस्थाचा निवडणुकीचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. त्याची प्रक्रिया सुरू झालेले होते काय संस्थाचे अर्पण त्यातच राज्य शासनाने पूराचे कारण देत निवडणुका 30 सप्टेंबर पर्यंत स्थगित करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची झालेली आहे.
सातारा जिह्यातील शिक्षक सहकारी बँक पोलीस क्रेडिट सोसायटी, सातारा जिल्हा सहकारी नोकरांची पतपेढी, सातारा जिल्हा शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतपेढी, भांबे विकास सेवा सोसायटी, पाटण तालुका खरेदी विक्री सेवा संस्था, खंडाळा तालुका खरेदी विक्री सेवा संस्था यासह संस्थांचा निवडणुकीच्या कार्यक्रम सुरू होता. काही ठिकाणी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर काही ठिकाणी अर्ज छाननीची प्रक्रिया सुरू होती असे असताना अनेक इच्छुक आपला उमेदवारी अर्ज कसा निवडणुकीच्या रिंगणात राहील यासाठी प्रयत्न करत होते. असे असताना अचानक शुक्रवारी सायंकाळी आदेश काढण्यात आला. त्या आदेशामध्ये पाऊस असल्याने पावसामुळे जनजीवन ठप्प व वाहतुकीची समस्या लक्षात घेता. या निवडणुका 30 सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. असे त्या आदेशात नमूद केले असून त्या आदेशावर कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांची स्वाक्षरी आहे. त्यामुळे या निवडणुकीची तयारी करणायांची चांगली झालेली आहे.
सभासद संभ्रमात
सहकारी संस्थांच्या निवडणुका लागलेल्या असल्याने सर्व सभासद मतदान करण्यासाठी उत्साही बनले होते. पावसातही प्रचार जोरदार सुरू होता. वातावरण चांगले तापले होते. असे असताना राज्य सरकारने काढलेल्या आदेशामुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली त्यामुळे सभासद वर्ग संभ्रमात आहे.