प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून गुरुस्पंदन व प्रगतीपर या दोन गटाच्या माध्यमातून निवडणूक पार पडणार आहे. बेळगाव ग्रामीणमधून 30 जागांसाठी निवडणूक होणार असून याकरिता गुरुस्पंदन मधून 20 पुरुष व 10 महिला तर प्रगतीपर मधून 20 पुरुष 10 महिला उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामीण भागात निवडणुकीच्या निमित्ताने जोरदार प्रचार सुरू आहे.
ग्रामीणमध्ये प्रगतीपर गटातून अडिवेप्पा मल्लन्नवर, चंद्रशेखर कोलकार, हणमंत भजंत्री, इराप्पा गुळाप्पान्नावर, जोतिबा रेमानी, केंपन्न निर्वानी, मैलार होरकेरी, मारुती नागण्णावर, मोहन करेन्नावर, एन. सी. जाधव, नारायण निलजकर, नवीन पाटील, प्रकाश देयन्नावर, आर. व्ही. गोणी, रुद्राप्पा बडिगेर, सिद्धाप्पा गाणगी, सुरेश कोलकार, उदय उपरी, यल्लाप्पा पुजेरी, यल्लाप्पा नाईक हे पुरुष उमेदवार तर महिलांमधून चांदवी कलाल, ललीता काकडे, महादेवी होट्टीनवर, मंगल येळ्ळूरकर, पूजा पाटील, रोहिनी वाघमोडे, सविता हनमन्नवर, शैलजा कडेमनी, शोभा बंदकनवर, शोभा वी हे उमेदवार रिंगणात आहे.
गुरुस्पंदन गटातून 30 उमेदवार
तर गुरुस्पंदन गटातून 30 उमेदवारांनी अर्ज भरले असून यामध्ये आनंदगौडा काद्रोळी, अन्वर लंगोटी, अशोक अरवळ्ळी, बसाप्पा सुणगार, बसवराज कंबार, बेनकट्टी रविंद्र, केदारी गुंजीकर, किरण करंबळकर, एम. बागवान, नामदेव कानशीडे, ईश्वर पाटील, प्रल्हाद दळवी, आर. के. गुरव, एस. गाणगी, एस. कौतगार, संपत सुखये, सतीश कदम, शेखर करंबळकर, सुनील बागेवाडी, विरप्पा मुळळूर हे पुरुष उमेदवार आहेत. शिवाय महिला विभागातून अनुराधा तारीहाळकर, चांगुणा देसाई, गुलनारबेगम शबासखान, जय़श्री केरीमठ, जयश्री कोळेकर, किरण गायकवाड, राज़श्री अन्नी, सैराबानू मुगुट, सुशिला रजपूत, वनिता सायनेकर या महिला उमेदवारांनी अर्ज केले आहेत.