प्रतिनिधी/ वडूज
वडूज येथील अक्षता मंगल कार्यालयात खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीचा जाहीर मेळावा झाला. या मेळाव्यात आगामी काळात संघटनेची मजबूत बांधणी करण्याचा निर्धार करण्यात आला. या मेळाव्यात शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष विद्यासागर माने यांच्यासह सुमारे 20 कार्यकत्यांनी समितीमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिक्षक संघास खिंडार पडल्याची चर्चा शिक्षक वर्गात आहे.
समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, जिल्हाध्यक्ष शंकरराव देवरे यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. यावेळी राजन कोरेगांवकर, प्रदिप कदम, संतोष घोडके, संचालक किरण यादव, चंद्रकांत मोरे, श्री. शेवाळे, बँकेचे माजी उपाध्यक्ष कांतआण्णा फडतरे, विश्वंभर रणनवरे, विठ्ठलराव फडतरे, शशिकांत बागल, संजय तिडके, अरुण खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्री. शिंदे म्हणाले, यापूर्वी खटाव तालुका हा समितीचा बालेकिल्ला होता. अपवाद वगळता या तालुक्याने शिक्षक बँक व इतर संघटना पातळीवरील लढाईत नेहमीच समितीला भक्कम पाठबळ दिले आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे मागच्या खेपेस निवडणूकीत एक जागा कमी झाली. मात्र आत्ता नवीन होतकरु कार्यकत्यांनी संघटनेची मजबूत बांधणी करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे निश्चितपणे भविष्यकाळात परिवर्तन होईल.
या मेळाव्यात संघाचे अध्यक्ष श्री. माने यांच्यासह प्रसाद महामुनी, दत्तात्रय सावंत, संग्राम गोसावी, नंदराज हडस, संदिप चंदनशिवे, हणमंत जाधव, सतिश खाडे, बाबासाहेब केदार, प्रभाकर गायकवाड, आनंदराव खाडे, सुभाष सलगर, अनिता माने, योगिता गोसावी, सिमा चंदनशिवे, आशा खाडे, स्वाती जाधव आदिंनी समितीमध्ये जाहीर प्रवेश केला.
तालुकाध्यक्ष अर्जुन यमगर, सरचिटणीस नवनाथ जाधव यांनी स्वागत केले. श्री. रणनवरे यांनी प्रास्ताविक केले. आबासाहेब जाधव यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रमास उपाध्यक्ष शिवाजी लखापते, माजी सरचिटणीस विजय गोरे, किरण गोडसे, पोपट माळवे, उमेश पाटील, गोविंद माळवे, सुनिल खाडे, सौ. काळे, सौ. जाधव, सौ. माने आदिंसह शेकडो शिक्षक उपस्थित होते.