प्रतिनिधी/ सातारा
प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शिवजयंतीनिमित्ताने विविध मान्यवरांचा आणि यशस्वी विद्यार्थ्याचा गुणगौरव सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळाप्रमुख सन्मती देशमाने हे होते. यावेळी राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान बुधचे अध्य़क्ष सुरेश पोळ, लेखा वित्त विभागाचे अधिकारी वैभव घाडगे, संस्थेचे जयवंतराव माने, प्राचार्य जाधव, प्रा. झुंजार माने, सस्केस ऍकॅडमीचे अध्यक्ष किरण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षण परिक्षा परिषद पुण्याचे सह आयुक्त रमेश चव्हाण यांना सामाजिक सेवा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तीन जणांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. शुभम भुतकर यांनी पोवाडा सादर केला. सौ. पवार यांनी सुत्रसंचालन केले. श्रीमती कदम यांनी आभार मानले.