विजय गवळी / कराड :
विविध क्षेत्रात पारंगत व तरबेज असणारे शिक्षक विद्यार्थीवर्गासाठी उर्जेचे स्तोत्र असतात आगाशिवनगर (ता. कराड) येथील अशाच एक तंत्रस्नेही नवदुर्गा सुरेखा वायदंडे ( चव्हाण ) विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान आहेत म्हणूनच शासनाने व अनेक संस्थानी त्यांना 20 हून अधिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
शिक्षणक्षेत्र सर्वात श्रेष्ठ क्षेत्र शिक्षणाच्या माध्यमातून डॉक्टर, वकील, इंजिनियर याबरोबरच वर्ग एक व वर्ग दोनचे अधिकारी घडवले जातात आणि असे विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांच्या जीवनात विविध पैलू पाडणाऱ्या तंत्रस्नेही नवदुर्गा म्हणजे सुरेखा प्रभाकर वायदंडे प्राथमिक शिक्षकाची नोकरी ही केवळ अर्थकारणासाठी नसून समाजकार्याचा महत्वपूर्ण भाग आहे आणि हेच कार्य सुरेखा वायादंडे करीत आहेत. सध्या त्या जिल्हा परिषद शाळा आगाशिवनगर नंबर एक या ठिकाणी पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे सासर हेळगाव तर माहेर मलकापूर आहे. नोकरीची सुरुवात त्यांनी राहुडे (ता. पाटण) येथून केली सर्वच ठिकाणी त्यांनी अध्यापनाचे कार्य उत्कृष्ठ केलेले आहे. पण समुपदेशनाच्या माध्यमातून अनेकांचे संसार फुलवले आहेत. त्यांचे अनेक विद्याथी शिष्यवृत्तीमध्ये झळकले आहेत. तसेच बुध्दीबळ, नृत्य व विविध मैदानी खेळामध्ये विद्यार्थी जिल्हास्तरापर्यंत पोहोचले आहेत. सुरेखा वायदंडे यांनी आत्तापर्यंत लोकसहभागातून शाळेसाठी पाच संगणक व एलईडी घेतला असून दोन लाख रुपयांचा शैक्षणिक उठाव केलेला आहे. त्यांचे स्वतःचे यूटय़ुब चॅनल व ब्लॉग आहे. तसेच शिक्षक सक्षमीकरण अंतर्गत जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धत प्रथम क्रमांकही पटकावला आहे.
लॉकडाऊनच्या काळात व्हॉटसऑपच्या माध्यमातून विविध पीडीएफ फाईल, व्हीडीओ त्यांनी विद्यार्थीवर्गापर्यत पोहचवले, झूम ऍपद्वारे पालकांशी सतत संपर्क ठेवला आहे. अनेक प्रशिक्षणात त्यांनी तालुका व जिल्हास्तरीय तज्ञ मार्गदर्शक म्हणूनही काम केले आहे.तर त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. 1996 ला झाली. त्यानंतर त्यांनी कोरेगाव तालुक्यात त्यामध्ये सह्याद्रीरत्न आदर्श शिक्षक, मेड इन. व सध्या त्या इंडिया आयकॉन, गरुडझेप पुरस्कार, लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कार
2020, महाराष्ट्र पुरस्कार 2020, यासह नारी शक्ती पुरस्कार दिल्ली, सावित्रीबाई फुले पुरस्कार नायगांव, नारी सन्मान पुरस्कार, राष्ट्रीयस्तर सामाजिक पुरस्कार, दादासाहेब फाळके कोरोना पुरस्कार यासह वीस पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. याचबरोबर प्रहार दिव्यांग जिल्हा संघटनेच्या उपाध्यक्षा आहेत. तर व्यसनमुक्ती अंधश्रध्दा यासारख्या सामाजिक कार्यातही त्यांनी उठावदार कामगिरी केलेली आहे. सुरेखा वायदंडे यांचे काम केवळ शाळेतील मुलांसाठीच नाही तर पालक व समाजासाठी सुध्दा आहे. त्यातूनच त्यांनी आत्तापर्यंत अनेक मुलांना उच्च पदापर्यंत पोहोचवले आहे.