मुंबई : दिल्ली कॅपिटल्सचा डावखुरा सलामीवीर फलंदाज शिखर धवन गुरुवारी मुंबईमध्ये संघाच्या हॉटेलमध्ये दाखल झाला. हा खेळाडू अन्य संघसहकाऱयांप्रमाणे 7 दिवस क्वारन्टाईन असेल, असे दिल्ली कॅपिटल्स व्यवस्थापनाने स्पष्ट केले. यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी दिल्ली कॅपिटल्स संघातील काही खेळाडूंनी यापूर्वीच सराव सुरु केला असून पहिल्या सराव सत्रात आपण भरपूर आनंद लुटला असल्याची प्रतिक्रिया मध्यमगती गोलंदाज उमेश यादवने व्यक्त केली. मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियावर या संघातील खेळाडूंचे सराव सत्र आयोजित केले गेले होते. यंदा दिल्ली कॅपिटल्सची आयपीएल मोसमाची सुरुवात चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धच्या लढतीने होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर दि. 10 एप्रिल रोजी हे दोन्ही संघ आमनेसामने भिडणार आहेत.
Previous Articleशेतकऱ्याचा खून, दोघा भावांना आजन्म कारावास
Next Article विराट, डीव्हिलियर्स आरसीबी संघात दाखल
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.