चंदगडमार्गे महाराष्ट्रातून येणाऱया प्रवाशांना कर्नाटकात सोडावे : बेळगाव तहसीलदारांना निवेदन
वार्ताहर /कुद्रेमनी
बाची तपासणी नाक्मयावरून चंदगडमार्गे महाराष्ट्रातून येणाऱया प्रवाशांना बेळगावकडे सोडण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन बेळगाव तहसीलदारांकडे गुरुवारी शिनोळीनजीक (महाराष्ट्र) रास्ता रोको करून सुपूर्द करण्यात आले.
शिनोळी (बु.) ग्राम पंचायतीचे सरपंच नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बेळगावचे तहसीलदार कुलकर्णी यांना निवेदन दिले. यावेळी शिनोळी बु., शिनोळी खुर्द, देवरवाडी, महिपाळगड, सुपे, तडशीनहाळ, ढेकोळी आदी भागातील नागरिक उपस्थित होते.
कर्नाटक प्रशासनाकडून कोविड संसर्ग थोपविण्यासाठी आरटीपीसीआर किंवा कोविड व्हॅक्सिन चाचणी अहवाल तपासणी कडक केली आहे. बाची गावाजवळील नाक्मयावर प्रवासी, नागरिकांची कडक तपासणी होत असून कर्नाटकातील रहिवाशांना सोडण्यात येत आहे. मात्र, महाराष्ट्रातील नागरिकांना चाचणी अहवालाशिवाय प्रवेशबंदी झाल्याने बेळगावकडे जाणे कठीण झाले आहे.
चंदगड सीमाभागातील जनतेचा बेळगावशी कायमचा संबंध आहे. विविध प्रकारचे व्यवहार बेळगावशी आहेत. बाजारहाट, शेतीमाल विक्री व अन्य कामासाठी बेळगावलाच जावे लागते. पण बाची चेकपोस्टवर अडवणूक होत असल्याने याचा महाराष्ट्रातून येणाऱया नागरिकांना नाहक त्रास होत आहे. याची दखल घ्यावी अशा, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. याबाबत चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले आहे.
यापूर्वी चंदगडचे तहसीलदार, न्यायदंडाधिकारी विनोद रणवरे यांना निवेदन देऊन रास्ता रोकोची माहिती दिली होती. चंदगड भागातून येणाऱया महाराष्ट्रातील नागरिकांना बाची तपासणी नाक्मयावरून बेळगावकडे जाण्यासाठी कर्नाटक पोलिसांकडून अडवणूक होत असल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. ही अडवणूक थांबवावी अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता.
रास्ता रोको केल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. निवेदन दिल्यानंतर रस्ता खुला होऊन गर्दी कमी झाली. यावेळी कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर पोलीस बंदोबस्त होता. चंदगडचे पोलीस निरीक्षक करंडे, शिनोळी बुद्रुक सरपंच नितीन पाटील, उपसरपंच बंडू गुडेकर, प्रताप सूर्यवंशी, केतन खांडेकर, भैरू खांडेकर, डॉ. एन. टी. मुरकुटे, अमृत जत्ती, नारायण पाटील, राजू खांडेकर, अर्जुन पाटील, विनोद पाटील, प्रवीण पाटील, नामदेव सुतार, विशाल सावी, युवराज पाटील, पोलीस अमोल पाटील, देसाई, गवळी, सोनुले, राजू किटवाडकरसह युवावर्ग, नागरिक उपस्थित होते.