वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दक्षिण आफ्रिकेत 1 एप्रिलपासून सुरू होणाऱया आंतराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कनिष्ठ महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने जोरदार पूर्वतयारीला प्रारंभ केला आहे. या स्पर्धेसाठी अंतिम टप्प्याच्या सराव शिबिराकरिता हॉकी इंडियाने 28 महिला हॉकीपटूंची घोषणा केली आहे.
भुवनेश्वरमध्ये या सराव शिबिराला 28 फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. सदर शिबीर 26 मार्चपर्यंत चालणार आहे. यानंतर भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघ दक्षिण आफ्रिकेला प्रयाण करणार आहे. निवड करण्यात आलेल्या 28 हॉकीपटूंमध्ये गोलरक्षक बिचूदेवी खरिबाम, खुशबू, माधुरी किंडो, एल. मारिना, प्रिती, प्रियांका, इशिका चौधरी, अक्षता ढेकळे, नीलम, वैष्णवी फाळके, सलीमा टेटे, रीत, मंजु चोरसिया, ज्योती छेत्री, अजमिना कुजूर, शर्मिला देवी, लालरेमसियामी, बलजीत कौर, निकिता टोप्पो, ऋतुजा पिसाळ, अनु, लालरीनडिके, जे. किशोरी टोप्पो, मुमताज खान, ब्युटी डुंगडुंग, दीपिका, संगीताकुमारी आणि एस. दीपिका यांचा समावेश आहे.