ऑनलाईन टीम / शिमला :
हिमाचल प्रदेशमधील शिमला जिल्ह्यात सोमवारी भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी हा भूकंप झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.
भूकंपाचे केंद्र शिमला होते. प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले असल्याची सूचना मिळाली नाही आहे. याआधी काही दिवसांपूर्वी चंबा आणि बिलासपूर मध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते.