ऑनलाईन टीम / लखनऊ :
शिया धर्मगुरू मौलाना कल्बे सादिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांचा मुलगा कल्बे नुरी यांनी दिली आहे.
कल्बे नुरी म्हणाले, एरा हॉस्पिटल मधील यांनी सांगितले की कल्बे सादिक यांना निमोनिया झाला आहे. सध्या त्यांची प्रकृती नाजूक असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. नुरी यांनी वडिलांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन सर्वांना केले आहे.
पुढे ते म्हणाले, वडिलांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. तसेच त्यांची कोविड टेस्ट देखील करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र त्यांना अजूनही श्वास घेण्यास त्रास होत आहे तसेच ऑक्सीजन लेवल देखील सातत्याने कमी होत असल्याने सध्या त्यांची प्रकृती नाजूक आहे.