वार्ताहर / शिये
शिये (ता. करवीर) येथील पै. राजरत्न कृष्णात पाटील व पै. संकेत गणपती कदम यांनी वजनीगटातील कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले.
ही स्पर्धा जयपुर, राजस्थान येथे झाली. ऑल इंडिया युथ कुस्ती गेम चॅम्पियनशिप २०२१ मध्ये या दोघांनी अनुक्रमे १२५ व ४५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.या दोघांनी मागील वर्षभरात चांगली कामगिरी करत विविध स्पर्धांमध्ये पदकांची कमाई केली आहे.
त्यांच्या या कामगिरीमुळे पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धैसाठी निवड करण्यात आली आहे. यांच्या निवडीमुळे शिये कुस्ती क्षेत्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.त्यामुळे शियेसह परिसरातून राजरत्न व संकेतवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.या निवडीसाठी राजरत्न याला क्रीडाशिक्षक संदीप पाटील, वडील कृष्णात, आई नकुशा, माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील व पाटील कुटुंबीयांचे तर संकेतला क्रीडाशिक्षक संदीप पाटील वडील गणपती,आई सुधा, भाऊ पंकज कदम व कदम परिवाराचे मार्गदर्शन लाभले.