शिये/प्रतिनिधी
शिये (ता.करवीर) येथे पाचवा रुग्ण पाॅझीटिव्ह सापडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीने दि. १८ ते २२ जुलै पर्यंत शिये संपूर्ण गाव पाच दिवस लॉक डाऊन करण्यात येणार असल्याचे सरपंच रणजित कदम यांनी सांगितले.
दिवसेंदिवस कोरोनाचा विषाणूंचा संसर्ग वाढत असल्याने या विषाणुंची साखळी तोडण्यासाठी शियेगावभाग, विठ्ठल नगर, क्रशरविभाग, श्रीराम नगर, हनुमान नगर येथील दुध संकलन व औषध वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. यामध्ये सकाळी सहा ते दहा व सायंकाळी पाच ते सात या वेळेत दुध व शेतीच्या कामासाठी शितीलता राहणार आहे. तसेच अंत्यविधी व रक्षाविसर्जन कार्यक्रमासाठी वीस पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये. तसेच पाॅझीटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यानी स्वयंस्फुर्तीने आपली तपासणी करून घ्यावी.असे आवहान सरपंच रणजित कदम यांनी केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, उपसरपंच माधुरी शिंदे, पोलीस पाटील मनिषा सिसाळ, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. शोभा सुर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी के.बी.पाटील, तलाठी केसरकर, व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.