वाठार किरोली/प्रतिनिधी
शिरंबे ता. कोरेगाव जि. सातारा येथे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक वीज पडून दीड एकर ऊस भस्मसात झाला. सिकंदर मकबूल मुजावर, मुमताज सिकंदर मुजावर यांचा शिरंबे हद्दितील गट नं. ६३३ मधील एक एकर वीस गुंठे,तसेच दिपक हिंदुराव शिंदे वेलंग यांचा शिरंबे हद्दितील गट नं. ६३६ दोन एकर वीस गुंठे मधील तुटुन गेलेल्या ऊसाची पांचट व पाईप तसेच प्रसाद उत्तम भोसले यांची मका असे बरेच साहित्य जळून भस्मसात झाले. सुसाट वारे असल्यामुळे आग भयानक होती.
शेतकरी मुजावर यांच्या ऊसाला तोड चालू होती. त्यातच त्यांचे नुकसान झाले. बाळू मानकऱ्यांची टोळी तोडलेला ऊस भरत असताना त्याच उभा असलेला ऊस व मोळ्या ही जळून खाक झाल्या. तसेच यावेळी जरंडेश्वर कारखान्याचे विभागीय अधिकारी राजेश जाधव व स्लीप बाॅय निवास यादव यांनी जळालेल्या फडास तातडीने भेट दिली.आगीने भयानक रूद्ररूप धारण केले होते. यावेळी पंचनामा तलाठी सौ.मोनाली चव्हाण शिरंबे व सर्कल माधवी देशमुख यांनी केला आहे.