डिचोली मामले दारांकडून देवस्था नसमितीला सुचना : कोवीडमहामारी आणि 144 कलमामुळे जत्रा रद्द करण्याची सुचना.
प्रतिनिधी / डिचोली
राज्यातील तसेच राज्याबाहेरील असंख्य भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या शिरगाव गावतील श्री देवी लईराईचा जत्रोत्सव यावषीही कोरोना महामारीमुळे रद्द करण्याची सुचना डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी देवस्थान समितीला केली आहे. यासंदर्भात डिचोली मामलेदार कार्यालयात महत्वाच बैठक संपन्न झाली. या बैठकीस श्री लईराई देवस्थान समितीचे अध्यक्ष महादेव गावकर, सरपंच अच्य?त गावकर व इतरांचीही उपस्थिती होती.
सध्या राज्यात सर्वत्र पसरलेल्या आण भयानक वातावरण निर्माण केलेल्या कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांकडून 144 हे जमावबंदीचे कलम जारी करण्यात आली आहे. त्याण अंमलबजावणीही कडकपणे सुरू असल्याने राज्यातील बहुतेक देवस्थान समित्यांनी देवस्थाने लोकांच्या भेटींसाठीही बंद केली आहेत. तसेच अनेक मंदिरांतील उत्सवही बंद केलेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिरगाव गावातील देवीच्या या जत्रोत्सवात लाखेंच्या संख्येने धोंडगण आणि भाविकांची उपस्थिती असते. त्यामुळे सदर गर्दीवर सध्याची कोवीड प्रतिबंधक मार्गदर्शक तत्वा?चे पालन होणे अशक्मयच आहे. त्यासाठी सार्वजनिकरित्या होणारा हा जत्रोत्सव रद्द करण्यात यावा. मंदिराच्या पुजाऱयांकरवी मंदिरातील धार्मिक विधी कार्यक्रम करू शकता, असे मामलेदार तथा देवालय प्रशासक प्रवीणजय पंडित यां?नी बैठकीत सुचविले.
या बैठकीस पोलीस उपनिरीक्षक किशोर रामानंद, वाहतूक विभाग पोलीस उपनिरीक्षक सुभदा बायकर, वीज खात्याचे कनि÷ अभियंता अमेय गोवेकर, अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद गावस, व इतरांची उपस्थिती होती.
या देवीचे असंख्य भक्तगण व भाविकांना यावषी जत्रोत्सव होमार नसून कोणीही शिरगावात येऊ नये. आपापल्या घरीच देवीची आराधना करावी असे जाहिर करण्याणी सुचना मामलेदार पंडित यांनी देवस्थान समितीचे अध्यक्ष महादेव गावकर यांना केली. याविषयी आपण सर्व भक्तां?ना जत्रोत्सवाविषयी जाहीर माहिती देणार असल्याचे देवस्थान अध्यक्ष गावकर यांनी सांगितले.
12 ते 17 हे सहा दिवस शिरगावातील देवीच्या मंदिराकडे पोलीस फौज तैनात करताना शिरगावात प्रवेश करणारे सर्व रस्ते, वाटा कडकपणे अडविण्यात याव्यात. शिरगाव गावाबाहेरील कोणालाही गावात प्रवेश देऊ नये. केवळ जिवनावश्यक वस्तु?ची वाहतूक सोडल्यास कोणत्याही इतर वाहनांना गावात प्रवेश देऊ नये. तसेच इतर भाविक भक्तांनाही गावात प्रवेश देऊ नये, अशी सुचना मामलेदारांनी पोलीस उपनिरिक्षकांना दिली. गावातील रस्ते व वाटा बंद करण्यासाठी शिरगाव पंचायतीनेही सहकार्य करावे, अशी विनंती पोलिसांनी केली. मामलेदार पंडित यांनीही पंचायत सरपंच आणि देवस्थान समिती अध्यक्षांना पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
डिचोली वाहतूक पोलिसांनाही वाहतूक व्यवस्था हाताळण्याची सुचना मामलेदारांनी केली. तसेच डिचोली अग्निशामक दलाच्या अधिकाऱयांनाही शिरगावातील मंदिराजवळ बंदोबस्त ठेवताना काही आपत्कालीन घटना घडल्यास लक्ष ठेवावे अशी सुचना केली. तसेच वीज खात्याच्या अभियंत्यांना पोलिसांतर्फे अडविण्यात येणारी सर्व ठिकाणांवर वीज व्यवस्था उपलब्ध करून प्रकाश घालावा अशी सुचना केली.
गेल्यावषीही शिरगाव गावातील जत्रोत्सव रद्द करण्यात आली होती. त्यावेळी लॉकडाऊन होते. पण त्यातही काहीप्रमाणात सुट देण्यात आल्याने जत्रोत्सवाच्या दिवशी शिरगावात धोंडगण आणि इतर भक्तगणांची गर्दी होणार नाही. याची दखल घेत जत्रोत्सव रद्द करण्यात आला होता. यावषीही शिरगावातील हि प्रसिद्ध जत्रा रद्द करण्याची पाळी देवस्थान समिती आणि प्रशासनावर आली आहे. जत्रोत्सव रद्द करण्यात आली असल्याने भाविकांनी शिरगावात उपस्थिती लावू नये असे आवाहन करण्यात आले आहे.