शिरढोण / वार्ताहर
येथील ग्रामपंचायतीच्या अनागोंदी व मनमानी कारभाराचा फटका शौचालय साफसफाई करणाऱ्या एका गरीब दाम्पत्याला बसला आहे. गावातील सार्वजनिक शौचालये साफ करण्यासाठी ठरवून दिलेल्या रक्कमेतील निम्मी रक्कम त्या दाम्पत्याच्या हातावर टेकवून ग्रामसेवकांकडून उडवाउडवी उत्तरे मिळाल्याने संतप्त झालेल्या त्या दाम्पत्याने ग्रामपंचायतीच्या दारातच ठिय्या मारला.
त्यामुळे हा प्रकार अंगलट येणार असे दिसताच तेथील कर्मचार्यांनी ग्रामपंचायत उघडी ठेवूनच पळ काढल्याची चर्चा जोरदारपणे सुरू आहे.
दरम्यान आंदोलन सम्राट विश्वास बालीघाटे व सुरेश सासणे यांनी त्याठिकाणी धाव घेऊन त्या अन्यायग्रस्त दाम्पत्याची विचारपूस करून
ग्रामसेवक जी डी अदलिंग यांना धारेवर धरले
नृसिंहवाडी येथील सफाई कामगार किशोर चव्हाण व त्यांची पत्नी पूजा चव्हाण यांना शिरढोन येथील सार्वजनिक शौचालय साफ करण्याचे काम बावीस हजारांना मिळाले असल्याचे म्हणणे त्या दाम्पत्याचे आहे. मात्र ग्रामसेवकांनी उडवाउडवीची उत्तरे देत तुम्हाला केवळ दहा हजार द्यावे लागतात असे सांगितले. त्यामुळे हवाला दिल झालेल्या त्या दाम्पत्याने ग्रामपंचायतीच्या दारातच ठिय्या आंदोलन करत उपोषण केले. त्यावेळी बालीघाटे व सासणे यांनी ग्रामसेवक आदलिंग यांना फोनवरून संपर्क साधून याबाबत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे गोंधळलेल्या साहेबांनी दोन दिवसात मार्ग काढू असे सांगितले.
मात्र या दाम्पत्याचे कष्टाचे पूर्ण पैसे मिळले नाही तर तीव्र उपोषणाचा इशारा विश्वास बालीघाटे व सुरेश सासणे यांनी दिला आहे. तसेच ग्रामसेवक अदलिंग यांच्या कामाची खातेनिहाय चौकशी करून कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.