ओटवणे/प्रतिनिधी-
दोन आठड्यांपूर्वी पुराचा फटका बसलेल्या शिरशिंगे मळईवाडीतील २०, कलंबिस्त ख्रिश्चनवाडीतील ३० तर माडखोल घवडकीतील ३५ पूरग्रस्त कुटुंबाना शिवसेनेच्यवतीने जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून पूरग्रस्ताना ही मदत करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, सांगेली शिवसेना विभागप्रमुख पुरुषोत्तम राऊळ, विभाग संघटक सुरेश शिर्के, माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत, शिरशिंगे उपसरपंच पांडुरंग राऊळ, सांगेली सरपंच रमाकांत राउळ, उपविभागाप्रमुख दिलीप राऊळ, पांडुरंग राऊळ संतोष राऊळ, विजय राऊळ, प्रभाकर राऊळ, राजन राऊळ, गुरु राऊळ, सागर येडगे, सुरेश सावंत, अमित देसाई, सुभाष सुर्वे, रामचंद्र भिंगारे, आनंद सावंत, सुभाष रेमुळकर, संतोष चव्हाण, सुरेश पास्ते, बाळकृष्ण पास्ते,राजेश देसाई, राजेश नाईक आदी उपस्थित होते.