कुपवाड / प्रतिनिधी
शिराळा तालुक्यातील पणूंबे येथे राहणाऱ्या ऋषिकेश सिताराम गुरव (वय 22) या अविवाहीत तरुणाने बुधवारी दुपारी सावळी येथील एका पार्क जवळील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली आहे. सावळीचे पोलीस पाटील अंकुश सिताराम कांबळे यांनी पोलीसात वर्दी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत ऋषिकेश गुरव हा शिराळा तालुक्यातील आहे. बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सावळी (ता. मिरज) येथील परिख पार्क जवळील एका लिंबाच्या झाडाला एका तरुणाने गळफास लावून घेतल्याची घटना उघडकीस आली. याबाबत माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी पंचनामा केला. यावेळी त्या मयत तरुणाचे नाव ऋषिकेश गुरव असे निष्पन्न झाले. दरम्यान, त्या तरूणाने आत्महत्या का केली? याबाबत रात्री उशिरापर्यंत नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहेत.