शिराळा / प्रतिनिधी :
जिल्हाधिकारी सांगली यांच्या आदेशानुसार, कोरोना प्रतिबंधात्मक योजनेच्या अंतर्गत, नागपंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिराळा शहरातील दूध विक्री, मेडिकल आणि दवाखाने वगळता शहरातील इतर सर्व दुकाने व आस्थापना आज गुरुवार दिनांक १२ सायं. ५ वाजलेपासून शनिवार दिनांक १४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत पुर्णतः बंद राहतील.
शिराळा नगरपंचायतीने याबाबत शहरातील सर्व नागरिक ,व्यापारी ,फळ व भाजीपाला विक्रेते यांना याबाबत जाहीर आवाहन केले आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करणेत येईल असे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी सांगितले आहे.