आपल्या लग्नासाठी पुढाकार घेत नसल्याने केला पित्याचा खून : लोखंडी सळी व टाईल्स डोक्यावर हाणून पित्याचा निघृण खून
प्रतिनिधी /फोंडा
तळपणवाडा-शिरोडा येथे एका युवकाने आपल्या लग्नासाठी वडील कोणताच पुढाकार घेत नसल्यामुळे जन्मदात्या पित्यावर लोखंडी सळी (पारय) व सिमेंट टाईल्स डोक्यावर हाणून निघृण खून केल्याची घटना काल बुधवारी दुपारी उघडकीस आली. गणेश गावकर (65) असे मयत वडीलाचे नाव आहे. याप्रकरणी संशयित मुलगा राजेश गणेश गावकर (34)याच्याविरोधात फोंडा पोलिसांनी भा.दं.सं. 302 कलमाखाली खूनाचा गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना काल बुधवार दुपारी 2 वा. सुमारास उघडकीस आली. मयत गणेश गावकर आपल्या लग्नासाठी पुढाकार घेत नसल्याचे शुल्लक कारणावरून राजेशचे काडाक्याचे भांडण झाले. दारूच्या नशेत असलेल्या राजेशने आपल्या वडीलावर लोखंडी सळई (पारय) सहाय्याने सिमेंटचा टाईल्स उखडला व त्य़ाच्या डोक्यावर हाणला. त्यानंतर लोखंडी सळईने डोक्यावर वार करून त्याला चितपट केले. बांबोळी येथे उपचारासाठी नेत असताना गणेश याचा मृत्यू झाला. गोमेकॉतील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ठेवण्यात आला आहे.
विवाहीत मुलीच्या पत्नीचे निधन, आईनंतर पित्याचा खूनामुळे झाली पोरकी
मयत गणेश गावकर हा अंत्यत कष्टाळू इसम होता. कबाडकष्ट करून शेती व काजू बागायती करीत होता. तसेच फावल्या वेळेत गवंडीचे काम करून आपल्या कुटूंबियाचा उदारनिर्वाह करीत होता. मयतच्या पत्नीचे चार वर्षापुवी निधन झाले आहे. त्याला एकुलत्या मुला व्यक्तीरित दोन विवाहित मुली आहे. एक मुलगी कुडतरी तर दुसरी मुलगी तळपणवाडा येथे लग्न करून दिलेली आहे. तीच्या नवराच्या अकाली निधन झाल्यामुळे ती अधूनमधून आपल्या माहेरी वडील व भावासाठी जेवण बनविण्यापासून घरकामात मधूनमधून लक्ष देत असे. मात्र भावाने आपल्या जन्मदात्या वडीलाचो खून केल्याने तीला मानसिक धवका बसल्याने ती अत्यवस्थ झालेली आहे. तीचा जणू आधारच हरपला आहे. लग्नानंतर पतीचे अकाली निधन आईचे चार वर्षापुवीं निधन व एकमेव आधार असलल्या वडीलाचा भावाने निघृण खून केल्याने जगण्याचा आधार गेल्याने पोलीस स्थानकात टाहो फोडीत होती.
संशयित मुलगा याला दारूचे व्यसन असून तो अधूनमधून पितापुत्राचे चटके उडत असे. संशयित मासळी मानशीवर मिळेल ते काम करीत आहे. फोंडा पोलिसांनी त्याला खूनाचा आरोपाखाली गुन्हा नोंदवून अटक केली आहे. खूनसाठी वापरण्यात आलेले लोखंडी सळी व टाईल्स पोलिसांनी जप्त केले असून याप्रकरणी उपनिरीक्षक आदित्य वेळीप अधिक तपास करीत आहे.