प्रतिनिधी / पुलाची शिरोली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून गोरगरिबांना अल्प दरात जेवण मिळावे . यासाठी शिरोली गावामध्ये शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला आहे. सरपंच शशिकांत खवरे व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शिरोली फाटा येथील पंचवटी हाँटेल मध्ये थाळीचे वाटप करण्यात येणार आहे. सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत पाच रुपयाला जेवण मिळणार आहे. यासाठी उपक्रमासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी उपसपंच सुरेश यादव, मंडळ अधिकारी भरत जाधव, ग्रामविकास अधिकारी ए एस कठारे, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश पाटील, माजी उपसरपंच विठ्ठल पाटील, बाजीराव सातपुते, उत्तम पाटील, सूर्यकांत खटाळे, राजकुमार पाटील, मुकुंद नाळे, गणेश खोचीकर , विशाल खोचीकर, धनाजी हांडे आदी उपस्थित होते.