गायीमध्ये हातकणंगले तालुक्यातील माणगांवचे, अमोल मगदूम प्रथम
गोकुळश्री सिताराम शंकर पाटील यांचा सपत्नीक सत्कार करताना चेअरमन रविंद्र आपटे, माजी चेअरमन विश्वास पाटील, अरुण डोंगळे, उदय पाटील, सत्यजित पाटील, जयश्री पाटील-चुयेकर, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर आदी.
प्रतिनिधी / कोल्हापूर
गोकुळ दूध संघाच्या वतीने देण्यात येणाऱया `गोकुळश्री’ स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. म्हैशीमध्ये शाहू दूध संस्था शिरोली दुमाला संस्थेचे सभासद सिताराम शंकर पाटील व गायीमध्ये माणगांव, तालुका हातकणंगले येथील माणगांव दूध संस्थेचे अमोल पारीसा मगदुम यांनी प्रथम क्रमांक पटकावला विजेत्यांना चेअरमन रविंद्र आपटे माजी चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना रविंद्र आपटे म्हणाले, गोकुळ दूध संघाच्या वतीने दरवर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱया गायी, म्हैशींकरीता `गोकुळश्री’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गोकुळशी सलग्नग्न असणाऱया सर्व प्राथमिक दूध संस्थांच्या सभासदांकरीता या स्पर्धा प्रतिवर्षी घेण्यात येतात. दूध उत्पादकांना प्रोत्साहन देणे, जनावरांचे संगोपन सुधारणे, जनावरांमध्ये दूध उत्पादन क्षमता वाढविणे याचबरोबर दुग्ध व्यवसायामधून दूध उत्पादकांना जास्तीत जास्त आर्थिक लाभ करुन देणे तसेच तरुण पिढीला या व्यवसायाकडे आकर्षीत करुन दुग्ध व्यवसाय वाढविणे हा आहे. गोकुळने ही स्पर्धा गेल्या 27 वर्षापासून आपल्या कार्यक्षेत्रात सुरु केलेली आहे.
सिताराम पाटील यांच्या म्हैशीने दिवसाला 18 लिटर 860 मिली तर अमोल मगदूम यांच्या गायीने दिवसाला 35 लिटर 710 मिली दूध दिले आहे.
संघास जास्तीत जास्त व उत्तम प्रतिचे दूध पुरवठा करणाऱया संस्थाचाही सत्कार करणेत आला. जिल्हास्तरावर हनुमान वडकशिवाले यांनी दररोज सरासरी 4 हजार 302 लिटर, उदय पोर्ले या संस्थेने 3 हजार 840 लिटर तर श्रीराम चुये या संस्थेने 3 हजार 210लिटर इतका सरासरी दूधाचा पुरवठा केला आहे.
दूध उत्पादक आणि संस्थांना प्रोत्साहन
संघाकडून दूध उत्पादक आणि संस्थांना प्रोत्साहन दिले जाते. स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व दूध उत्पादक अभिनंदनास पात्र असून पुढील वर्षी जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी `गोकुळश्री’ स्पर्धेत भाग घ्यावा. विश्वास पाटील, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक
स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे-
म्हैस स्पर्धा
स्पर्धक गाव दूध बक्षिस हजारात
1 सिताराम शंकर पाटील शिरोली दु. 18.860 25000
2 श्रद्धा सागर साबळे तारळे 16.890 20000
3 विजय विठ्ठल दळवी लिंगनूर 16.810 15000
गाय
स्पर्धक गाव दूध बक्षिस हजारात
1 अमोल पारासा मगदूम माणगाव 35.710 20000
2 शांताराम आनंदा साठे सरवडे 31.420 15000
3 तानाजी सदाशिव पाटील सांगाव 30.920 10000