प्रतिनिधी / कोल्हापूर
शिरोली दुमाला येथे दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये अमोल बाळासाहेब घारे (वय 42) रा.कळंबा यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर अंकुश पाटील रा. पाटेकरवाडी व संग्राम पाटील रा. मांडरे हे दोघे जखमी आहेत त्यांच्यावर सी.पी.आर हॉस्पिटल, कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत.