प्रतिनिधी / शिरोळ
येथील कोळी गल्लीतील ५६ वर्षाच्या इसमाचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने खळबळ माजली असून एस.टी.स्टँड जवळील कोळी गल्लीतील काही भाग सील करण्यात आला आहे. या इसमाच्या घरातील सात आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या सहा अशा एकूण तेरा जणांना अलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहेत.
शिरोळ शहरातील कोळी गल्ली येथील शासकीय अधिकारी असलेल्या ५६ वर्षाच्या इसमास त्रास होऊ लागल्याने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. नगरपालिका प्रशासनाने तातडीने या भागाची औषध फवारणी करून हा परिसर सील केला. त्याचबरोबर त्यांच्या संपर्कात आलेल्या १३ जणांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आह.
गेल्या चार दिवसांपासून या भागात दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. नगरपालिकेने तातडीची बैठक घेऊन तीन दिवस शंभर टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमाचा भंग करणार्यावर १००० रु. दंडात्मक कारवाई तसेच विनाकरण फिरणार्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखालील ही बैठक संपन्न झाली मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांनी स्वागत केले.
शिरोळ शहर तीन दिवस संपूर्ण लॉकडाऊन. चौथ्या दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत व्यापार्यांना मुभा देण्यात आली आहे. नियमाचा भंग करयांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा नगराध्यक्ष पाटील यांनी दिला.
या बैठकीस माजी आमदार उल्हास पाटील दत्त कारखान्याचे संचालक अनिल राव यादव दिलीप पाटील उपनगराध्यक्ष प्रकाश गावडे पंचायत समिती सदस्य सचिन शिंदे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बी जी माने दरगु गावडे नगरसेवक सर्वश्री तातोबा पाटील पंडित काळे विराज यादव धनाजी पाटील नदेकर बाबा पाटील अमर शिंदे यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.