प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ येथील नंदिवली रोड लक्ष्मीनगर येथे बेकायदेशीर तीन पानी जुगार खेळत असताना सात लोकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले असून एक लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नंदिवली रोड लक्ष्मीनगर येथील सुभाष कांबळे यांच्या शेतातील झाडाखाली संशयित आरोपी सुभाष कांबळे, सुहास आवळे, अनिल माने, विलास माने, गणेश शिरोळ कर, सतीश वायदंडे व अवधूत भोरे या सात जनांनी बेकायदेशीर तीन पानी जुगार खेळत होते.
कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने जमावबंदी आदेश लागू केला आहे असे असताना तीन पानी जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले त्यांच्याकडून रोख तेवीसे रुपये, तीन मोटरसायकल,व जुगाराचे साहित्य असा एक लाख 23 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सात लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे सदरची वर्दी पो कॉ गजानन कोष्टी यांनी दिली आहे पुढील तपास पोलिस हवालदार डी डी सानप हे करीत आहेत.