प्रतिनिधी / शिरोळ
येथील नांदणी रोडवरील एका पेट्रोल पंपाच्या पाठीमागे बेकायदेशीर तीन पानी जुगार खेळत चौघे ताब्यात घेतले आहेत. दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेल्या या कारवाईमुळे खळबळ माजली आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, शिरोळ-नांदणी रोडवरील दत्तराज कृषी सेवा केंद्र पेट्रोल पंपाच्या पाठीमागे बेकायदेशीर तीन पाणी जुगार खेळत असल्याची माहिती खबर यामार्फत मिळाली. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गुन्हे शोध पथकांचे पोलिस हेड काँन्स्टेबल डी. डी. सानप हनुमंत माळी ताहीर मुल्ला व गजानन कोष्टी यांनी धाड टाकून प्रतिकसिंह जगदाळे, अशोक पुजारी, धनंजय नाईक सर्व राहणार शिरोळ व ज्ञानेश्वर कंदले रा. घालवाड यांना ताब्यात घेऊन एक लाख 94 हजार900 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये चार मोटरसायकली तीन मोबाइल व रोख रक्कम समावेश असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार पोलिस हेड काँन्स्टेबल डी. डी. सानप हे करीत आहेत.
तरी आज पथकाने कनवाड येथे 60 लिटर बेकायदेशीर गावठी दारू विकणार्या आई मुलास ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कनवाड ता. शिरोळ येथील प्रवीण राजे व संगीता राजे या माय लेकांनी बेकायदेशीररित्या जनावरांच्या गोठ्यांच्या आडुशाला गावठी दारू विक्री करत असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारित शिरोळ गुन्हेशोध पथकाच्या पोलिसांनी आज सकाळी दहा वाजता धाड टाकून तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच तंबाखूजन्य पदार्थ विक्री करीत असल्याचे आढळून आल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.