शिरोळ / प्रतिनिधी
येथील उपनगराध्यक्ष पदी राजेंद्र माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील होते. नगरपालिकेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ,स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची सत्ता आहे .उपनगराध्यक्ष प्रकाश गावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी गुरुवारी नगरपालिकेत सर्वसाधारण सभा झाली .निवडीसाठीऑनलाईन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
माने यांच्या अर्जावर सूचक प्रकाश गावडे यांनी तर नगरसेवक तातोबा पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी राजेंद्र माने यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा नगराध्यक्ष माने यांनी केली. निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष केला. यावेळी मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते निवडीनंतर नूतन उपनगराध्यक्ष माने यांचा सत्कार करण्यात आला.