शिरोळ/ प्रतिनिधी
येथील शिरोळ-जयसिंगपूर नांदणी नाक्याकडून शिरोळ रोड के.पी.टी.कडे भरगाव वेगाने जाणार्या डंपर (MH 09 EM/3330) ने शिरोळकडे जाणार्या होंडा मोटासायकल (MH 09 FC1469) या टू व्हीलर गाडीला जोराची धडक दिली. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हॉटेल पवार, टर्निंग पॉईंटसमोर हा अपघात झाला. या अपघातात राजेश शिवाप्पा द्राक्षे (वय 50, रा. वृंदावन हौसिंग सोसायटी, गल्ली नंबर 1, जयसिंगपूर) या मोटासायकलस्वाराला जोरात धडक बसली. रस्त्यावर जोरात पडल्याने त्यांच्या डोक्यास दुखापत होवून झालेल्या रक्तस्त्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर डंपर चालक आरोपी धोंडाप्पा निल्लाप्पा माळी (रा. माडग्याळ, ता. जत, जि. सांगली) यास शिरोळ पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा तपास शिरोळ पोलिस करीत आहेत.