प्रतिनिधी / कुरुंदवाड
शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीनंतर गावचा मुख्य कारभारी कोण याकडे सर्वच नवनिर्वाचित उमेदवारांचे तसेच जनतेचे गावा गावातील राजकीय गाव पुढाऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते, त्यातच राज्यातील महा विकास आघाडी सरकारने सदस्य निवडी नंतरच सरपंच आरक्षण घेण्यात येणार असे जाहीर केल्याने सर्वच उमेदवार आपल्याला सरपंचपदाची लॉटरी लागणार या आशेपोटी झटून कामाला लागले होते, आज येथील तहसीलदार कार्यालयात तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या सरपंच पदाचे आरक्षण चिठ्ठीद्वारे काढण्यात आले या आरक्षणामुळे अनेकांची लॉटरी लागली तर अनेकांचे पत्ते कट झालं जी चर्चा तहसीलदार कार्यालय परिसरात कार्यकर्त्याकडून होऊ लागली होती. यामुळे कही खुशी कही गम या सोडती मुळे परिस्थिती झाली होत.
शिरोळ तालुक्यातील 33 ग्रामपंचायत निवडणुका चुरशीने पार पडल्या गाव कारभारी ठरले मात्र मुख्य कारभारी कोण याकडे सर्व तालुक्यातील राजकीय नेत्यांसह कार्यकर्ते व जनतेचे लक्ष लागून राहिले होते निवडणुकीला सामोरे जाणारा प्रत्येक उमेदवार आपणच सरपंच होणार व आपल्याला सरपंच पदा ची लॉटरी लागणार हे निश्चित करून निवडणुकीला सामोरे गेला होता.
आज शिरोळ तालुक्यातील 52 गावाच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले यामध्ये नुकत्याच झालेल्या 33 ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणाचा समावेश होता. नुकत्याच झालेल्या 33 गावच्या ग्रामपंचायत च्या सरपंच पदाचे आरक्षण खालीलप्रमाणे
नागरीकांचा मागास प्रवर्ग
1) जांभळी, 2) मजरेवाडी( महिला) 3) आ गर( महिला)4) निमशिरगाव 5) चिपरी( महिला)6) हरोली 7) नृसिंहवाडी 8) गौरवाड( महिला) 9) टाकळी( महिला) 10) शिरदवाड ( महिला )11) कनवाड 12) कोंडिग्रे 13) दानोळी ( महिला)14) तमदलगे
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचपद झालेल्या ग्रामपंचायती खालील प्रमाणे
1) नांदणी 2) संभाजीपुर 3) टाकळीवाडी( महिला) 4) कुटवाड 5) धरणगुत्ती ( महिला)6) हेरवाड 7) जैनापूर( महिला) 8) राजापूर ( महिला) 9) दत्तवाड 10)) चिंचवाड
अनुसूचित जमाती सरपंचपद आरक्षित झालेली गावे
1) घोसरवाड ( महिला) 2) राजापूरवाडी
सर्वसाधारण खुला प्रवर्ग साठी आरक्षित झालेली गावे
1) कोथळी 2) कवठेसार 3) उदगाव 4) घालवाड 5) यड्राव 6) बस्तवाड 7) शेडशाळ 8) गणेश वाडी 9) आलास 10) लाटवाडी 11) औरवाड 12) नवे दानवाड 13) शिरढोण
सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सरपंच पद आरक्षित झालेली गावे
1) अर्जुनवाड 2) शिरटी 3) हसुर 4) अब्दुललाट 5) तेरवाड 6) कवठेगुलंद 7) बुबनाळ 8) खिद्रापूर 9) उमळवाड 10) टाकवडे 11) शिवनाकवाडी 12) अकिवाट 13) जुने दानवाड
तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या सरपंचपद आरक्षणा मुळे हे आरक्षण काय लागते हे पाहण्यासाठी शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर आज नुकत्याच झालेल्या 33 ग्रामपंचायती तसेच 2022 होणाऱ्या उर्वरित 19 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण काय पडते यासाठी तालुक्यातील सर्वच गावातील कार्यकर्ते लोकप्रतिनिधी यांनी गर्दी केली होती.
आजच्या सरपंच पदाच्या सोडतीनंतर अनेकांचा भ्रमनिरास झाला तर अनेकांना याची लॉटरी लागली अपेक्षेप्रमाणे जगाचे सरपंचपद आरक्षित झाले त्या गावातील कार्यकर्ते व लोकरी यांनी एकच जल्लोष केला अनेकांनी पेढे वाटून याचा आनंद व्यक्त केला मात्र अपेक्षेप्रमाणे सरपंचपद आरक्षित न झाल्याने त्यांचा भ्रमनिरास झाल्याचे चित्र आज दिसून आले