प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ तालुक्यातील कुटवाड येथून विवाहिता बेपत्ता झाली आहे. गीता शिवाजी पाटील (वय 40) असे विवाहितेचे नाव आहे. गीता या 4 जानेवारी 2020 पासून बेपत्ता असल्याची वर्दी शिवाजी तुकाराम पाटील यांनी शिरोळ पोलिसात दिली आहे.
दि. 3 जानेवारी रोजी शिवाजी व गीता यांच्यात किरकोळ वाद झाला होता. त्यामुळे दि. 4 जानेवारी रोजी त्या दुपारी घरातून निघून गेल्या. त्या अद्याप परत आल्या नसल्याने बेपत्ता झाल्याची वर्दी शिरोळ पोलिसात देण्यात आली आहे.