शिरोळ/ प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील बस्तवाड आकिवाट रोडवर आलेल्या मगरीला पकडण्यात शिरोळ येथील ऍनिमल ग्रुप व वनविभागाला यश आले आहे भीतीच्या छायेखाली असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे . गेल्या चार दिवसापासून बस्तवाड आकिवाट या रस्त्यावर सहा फूट पाच इंच मादी जातीच्या मगरीचा वावर होता यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते .
सायंकाळी सहाच्या सुमारास या मगरीचे पुन्हा स्थानिक लोकांना दर्शन झाले . ही बातमी वन विभागाला कळवले असता वनरक्षक सकट त्यांचे सहकारी व शिरोळ येथील ॲनिमल ग्रुपचे अध्यक्ष अनिल माने ,तुकाराम पाटील,विशाल पाटील,मालोजीराजे निंबाळकर गजानन सावंत श्रेयस धुमाळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जिवाची बाजी लावून मगर पकडण्यात यश मिळविले व वन विभागास सुपूर्त केली.
शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल माने तुकाराम माने ,सुनील माने, गजानन सावंत, विशाल पाटील ,मालोजीराजे निंबाळकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी विषारी जातीचे हजार शेकडो सापांना पकडून जीवदान दिले . तर तालुक्यातील शिरोळ कुरुंदवाड चिंचवाड या भागात मगरी पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले आहेत .या तरुणांना शासनाने विमा उतरावा अशी मागणी होत आहे.