प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 242 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. चौदाशे 52 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मतदान यंत्रासह सर्व अधिकारी व कर्मचारी रवाना झाले आहेत.
शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड, घालवाड, कुटवाड, हसूर, शिरटी, नृसिंहवाडी, गौरवाड, कवठेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी, आलास, बुबनाळ, बस्तवाड, मजरेवाडी ,तेरवाड, घोसरवाड, टाकळीवाडी, दत्तवाड, शिरढोण, शिरदवाड, यड्राव, धरणगुत्ती, नांदणी चिपरी कोंडिग्रे निमशिरगाव तमदलगे जांभळी, उदगाव,कोथळी , दानोळी, जुने दानवाड व जैनापुर या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. आरोप-प्रत्यारोपाच्या फेरीही करण्यात आल्या होत्या.
या 33 ग्रामपंचायतीच्या 4 25 सदस्य संख्या पैकी 24 जणांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कुटवाड व टाकळीवाडी या ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी कोणतेही उमेदवारी अर्ज दाखल केले नसल्याने ही जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. 399 जागेसाठी 992 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
शुक्रवार दि 15 रोजी मतदान होणार असून सोमवार 18 रोजी मतमोजणी केली जाणार आहे. एकूण वीस टेबलावर बारा फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. तर तेराव्या फेरीची मतमोजणी दोन मतदान यंत्राची केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.