जयसिंगपूर/प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यामध्ये कोरोनाची रूग्ण संख्या सतत वाढत असून तालुक्यातील तब्बल 44 जणांचे अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यात 611 इतकी रूग्ण संख्या झाली आहे.
तालुक्यामधील जयसिंगपूर शहरात तब्बल 28 रूग्ण सापडले असून अर्जुनवाड 3, कुरूंदवाड व यड्राव मध्ये प्रत्येकी 2 रूग्ण याशिवाय अकिवाट, नांदणी, अब्दुललाट, शिरदवाड, आगर, उदगाव, घोसरवाड, दानोळी, शेडशाळ आदी गावांमध्ये प्रत्येकी 1 रूग्ण सापडला आहे. तालुक्यात वाढत चालेली रूग्ण संख्या ही चिंतेत भर घालणारी आहे. प्रशासनाकडून बाधित रूग्णांचा परिसर कंन्टेमेंट झोन करण्यात येत आहे. तर आरोग्य विभागाकडून बाधितांच्या संपर्कातील नागरीकांची माहिती घेण्याचे काम रात्री उशीरा सुरू होते.