शिरोळ प्रतिनिधी
येथे पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती मन्सूर मुलानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून माजी उपसभापती व विद्यमान सदस्य संजय माने यांना पुन्हा उपसभापती पदाची संधी मिळणार आहे येत्या 3 मार्च रोजी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली निवडीची सभा होणार आहे.
येथील पंचायत समितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी महाविकास आघाडीची सत्ता आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उदगाव मतदारसंघातील सदस्य मन्सूर मुलानी यांची 26 ऑक्टोंबर 20 21 रोजी उपसभापती पदावर निवड करण्यात आली होती आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे 16 फेब्रुवारी रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला या रिक्त झालेल्या उपसभापतीी पदाची निवड येत्या 3 मार्च्च रोजी आयोजित करण्यात आली आहे या रिक्त जागेवर शिवसेनेचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य संजय माने उपसभापतीपदी निवड होणार आहे