प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ जयसिंगपूर मार्गावरील आगर फाटा कामानीजवेळ काल राजू हणमंत बनपट्टी याच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तिघांना शिरोळ पोलिसानी आज मंगळवार कर्नाटक कागवाड येथून ताब्यात घेण्यात आला आहे.
याबाबत पोलिसातून माहिती अशी सोमवारी सकाळी फिर्यादी राजू बनपट्टी बांधकाम व्यावसायिक हे आगरहुन जयसिंगपूरकडे मोटरसायकलीने जात असताना संशयित आरोपी हणमंता नागाप्पा गाडीवडर, संदीप रामू भोसले वय वर्षे 32 सुरज हणमंत चौगुले वय वर्षे 21 रा बावन झोपडपट्टी शाहूनगर जयसिंगपूर व प्रवीण सुभाष कोळी वय वर्षे 22 जैनापूर या चौघांनी फिर्यादिस चाकु व दगडाने हल्ला करून मारहाण केली व त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन अंगठी असा ऐवज लंपास केला होता. जखमी बनपट्टी यास जयसिंगपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
सदर संशयित आरोपी कर्नाटक कागवाड जि बेळगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्याआधारे पोलिसांनी संदीप भोसले सूरज चौगुले प्रवीण कोळी या तिघांना शिताफीने ताब्यात घेतले आहे. पथकामध्ये शिरोळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ताहीर मुल्ला हणमंत माळी गजानन कोष्टी आदी पोलीस सहभागी होते.