शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहरात शुक्रवारी रात्री कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार महिन्यांपासून शहरातील नागरिकांनी खबरदारी घेतली होती कोरोना विषाणूची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शनिवार सकाळी हरोली ता शिरोळ येथील ,47 वर्षाच्या इसमाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली आहे. तर शहरात आज दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शहरांतील अंदाजे 73 वर्षाच्या प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने हळवळ व्यक्त केली जात आहे. तसेच 47 वर्षाच्या इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. शिरोळ तालुक्यात शेकडो जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. एकाचा शासकीय रिपोर्ट आला आहे. अन्य दोघांचा रिपोर्ट आला नसल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पी.एस.दातार यांनी दिली. दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले. शिरोळ शहरात एकाच वेळी दोघांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची पहिलीच घटना आहे.