ऑनलाईन टीम / पुणे :
विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात शुभेच्छांचे होर्डिंग्ज लागले आहेत. त्यामधील एका होर्डिंगवर लिहिलेल्या वाक्यांमुळे ते होर्डिंग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, फडणवीस चांगलेच ट्रोल होत आहेत.
पुण्यात एका होर्डींगवर ‘शिल्पकार नव्या पुण्याचे!’, ‘नेतृत्त्व नव्या महाराष्ट्राचे!’ म्हणून फडणवीस यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे फडणवीस सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही हे होर्डिंग ट्विट करत फडणवीसांवर टिका केली आहे. मिटकरी यांनी म्हटले आहे की, ‘आता कमाल झाली, चक्क पुण्याचे शिल्पकार…, मला वाटतं यापेक्षा मोठा जोक असू शकत नाही. धन्य ते नेतृत्त्व आणि धन्य ते अंधभक्त’