प्रतिनिधी/ सातारा
खा. छ. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली भारतील जनाता पार्टी सांस्कृतीक प्रकोष्ठ महाराष्ट्र यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शिवगान स्पर्धेची पहिली फेरी नुकतीच परमपुज्य भरतमुनी यांच्या जयंती निमित्ति पार पडली. या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हय़ात करण्यात आले. त्यानुसार सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहागत सातारा ही स्पर्धापार पडली.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून मा. राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, या शिवगान स्पर्धेमुळे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ. शिवाजी महाराज यांचे आचार, विचार, त्यांचे आचरण, सर्व धर्मीयांना बरोबर घेऊन कार्य करण्याची पध्दत, शेतकऱयांची काळजी व शेतीसंबंधी योगदान, अशा विविध गुणांचा प्रसार तरूण पिढी आणि समाजात होण्यास मदत होणार आहे.
सध्याची तरूण पिढी तणावाखाली दिसते. अशा वेळी छ. शिवाजी महाराजांचे कर्तुत्व, आचार, विचार, तत्व तरूणांना दिशा देऊ शकेल. शिवगान स्पर्धेमुळे तरूण पिढी आपला मराठय़ांचा इतिहास वाचण्याकडे वळेल आणि त्यातून वैभवशाली इतिहासातून नेतृत्व करण्याची उर्मी निर्माण होईल, असे सांगितले. तसेच सर्व स्पर्धक व त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.
या स्पर्धेत समुहगान स्पर्धेसाठी संपुर्ण जिल्हय़ातुन 28 संघ व वैयक्तीकसाठी 42 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये वैयक्तीक गटात प्रसन्न रूईकर, प्राजक्ता महामुनी, शर्वरी काशिद व पियुशा भोसले यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच सांघिक गटात म्युझिक वॉरीयर ग्रुप पाटण, न्यू इंग्लिश स्कूल सातारा, श्रिराज बर्गे व स्वराली बर्गे तसेच आण्णासाहेब कल्यानी विद्यालय यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला.
विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पंकज चव्हाण, सहसंयोजक शिरीश चिटणीस यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी प्रदेश कार्यकारणी सदस्य उद्योजक आघाडीचे अमोल सणस, दिपक क्षीरसागर, निलेश शाह, सुनिशा शहा, विकास बनकर, नंदाताई, दिपाली आंबेकर, सातारा भाजपा शहर अध्यक्ष विकास गोसावी आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत पंकज चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चित्राताई भिसे यांनी केले. या स्पर्धेची अंतीम फेरी राजधानी सातारा येथील किल्ले अजिंक्यतारा येथे दि. 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे. याप्रसंगी महाराष्ट्राचे विरोधिपक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, खा. उदयनराजे भोसले, खा. रणजीतसिंह निंबाळकर, आ.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, भाजपा प्रवक्ते केशवराव उपाद्ये, कांताताई पाटील, अतुल भोसले, मदनदादा भोसले, सुभाषराव देशमुख, भरतनाना पाटील आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.