सोलापूर प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला शाहीर दिलीप सावंत लखीत व निर्मित शिव जन्माच्या पाळण्याचे प्रकाशन करविरचे छत्रपती शाहू महाराज यांचे हस्ते करण्यात आले यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले हा शिव जन्म पाळणा युट्युबच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्र, दिल्ली सह संपुर्णदेशात तसेच जगभरात हा पाळणा शिवजयंती दिवशी प्रसारित केला जाणार आहे. हा पाळणा वेदा सोनूले, शाहिरा तृप्ती सावंत, वैदेही जाधव यांनी गायला असून याला संगीतबद्ध अभिजित सुतार यांनी केले असून रेकॉर्डिंग झंकार स्टुडिओ यांनी केले आहे.
यावेळी सेवा संघाचे शहर अध्यक्ष संजय काटकर, पवन रायकर पुणे, दीपक पोवार पुणे यांचे सह कार्यकर्ते उपस्थित होते.