वार्ताहर /केरी
शिवजयंतीनिमित्त केरी सत्तरी येथील ‘ओव्हर ऐज बॉईज’ या गटातर्फे केरीतील श्री सातेरी केळबाय आजोबा देवस्थान परिसरात साफसफाई करण्याचा उपक्रम राबवला.
यावेळी या गटातील परेश गावस, विजय गावस, सतीश गावस, फटी गावस, सत्यवान परीट, नामदेव गावस, रुपेश, वैभव गावस, संगीता गावस, रेश्मा गावस, रेश्मा विठ्ठल गावस, सुप्रिया गावस, सुषमा शेटकर, सुमित्रा गावस व श्रेया गावस आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमाद्वारे मंदिरात आणि मंदिर परिसराची साफसफाई आणि प्लास्टिक व अन्य कचरा गोळा करून ग्रामपंचायतीच्या कचरा व्यवस्थापन यंत्रणेकडे सुपूर्द केला. केरी, घोटली आणि परिसरात सामाजिक कार्यात आपले योगदान देणाऱया या गटातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे. हल्लीच या गटाने घोटली 2 येथील दिव्यांग व्यक्तीला मानसिक, तांत्रिक आणि औषधोपचार पुरवण्याचे कार्य या गटातर्फे करण्यात आले होते. यावेळी या गटाने केरी मंदिर परिसराची साफसफाई केली. या उपक्रमाला देवस्थान समिती आणि नकुल नाईक यांनी सफाई साहित्य पुरवून सहकार्य केले.