प्रतिनिधी/ बेळगाव :
शिवजयंती चित्ररथ महामंडळ बेळगावतर्फे साहाय्यता निधीसाठी 51 हजार 501 रुपये निधी देण्यात आला. सदर निधी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी व आमदार अनिल बेनके यांच्याकडे सोपविण्यात आला. महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, उपाध्यक्ष नितीन भातकांडे, सरचिटणीस जे. बी. शहापूरकर, रविंद्र जाधव, विश्वनाथ पाटील, विजय जाधव, शरद पाटील, विनायक बावडेकर, अजित जाधव, संतोष गुंजीकर, संजय नाईक, श्रीकांत प्रभू व अन्य शिवप्रेमी उपस्थित होते.