2 वर्षांच्या खंडानंतर बेळगावातील ऐतिहासिक मिरवणुकीत ‘जय शिवराय’चा गजर : मंडळांकडून लक्षवेधी देखाव्यांचे सादरीकरण
क्षणचित्रे…
- चित्ररथ मिरवणुकीतून घडले मराठमोळय़ा संस्कृतीचे दर्शन
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील देखावे अधिक
- 10 ते 12 ढोल-ताशा पथकांचा घुमला आवाज
- डीजेच्या दणदणाटावर अखंडपणे थिरकली तरुणाई
- झांजपथक-लाठीमेळा मर्दानी खेळांनी वेधले लक्ष
- होसूर येथील मुलींच्या लेझीम पथकाने जिंकली मने
- पावनखिंड-शेर शिवराय चित्रपटातील गाण्यांची पेझ
- मध्यरात्री 3.30 वाजेपर्यंत शहरात एकच तुडुंब गर्दी
प्रतिनिधी /बेळगाव
‘शिवतेज अवतरले, चैतन्य सळसळले’ याचे प्रत्यंतर देणारी यंदाची शिवचित्ररथ मिरवणूक लक्षवेधी तर ठरलीच. परंतु मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणाईने बेळगावच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन घडवत मनामनात राष्ट्रप्रेमाचे स्फुलिंग चेतविले. जय शिवरायांच्या घोषणांनी दुमदुमणारा परिसर, ढोल-ताशांचा नाद, टाळ-मृदंगाचा ठेका, शिवकालीन घटनांचे प्रेरणादायी देखावे आणि उत्साहाने सळसळणारी तरुणाई, हे यंदाच्या मिरवणुकीचे ठळक वैशिष्टय़ ठरले.
शहर आणि परिसरात बुधवारी शिवजयंती मिरवणूक उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि सर्वांचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा थाट बुधवारी बेळगाव आणि परिसरात पहावयास मिळाला. सर्वत्र भगवे ध्वज, शिवकालीन पोवाडे आणि पताकांमुळे शिवमय वातावरण, पारंपरिक वेशात जल्लोष करणारे शिवप्रेमी, जय भवानी, जय शिवाजीचा अखंड गजर करीत शिवजयंत्योत्सव सर्वांनी थाटात साजरा केला. बुधवारी पहाटेपासूनच शिवमय वातावरणात बालचमू, महिला आणि अबालवृद्ध उत्सवाच्या तयारीसाठी कार्यरत झाल्याचे चित्र दिसून आले.
सामूहिक पातळीवरील शिवपूजन, झांजपथकांचा निनाद आणि फटाक्यांची आतषबाजी, गल्लोगल्ली लावण्यात आलेले भगवे ध्वज, भगव्या पताका यामुळे अवघे शहर शिवमय झाले होते. छत्रपती शिवरायांचा अखंड जयघोष करीत शिवप्रेमींनी आपला जाज्वल्य अभिमानच प्रकट केला. तालुक्यातील अनेक गावांमध्येही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून पारंपरिक पद्धतीने गावागावांत भव्य मिरवणुका काढण्यात आल्या.
देखाव्यांनी वाढविली मिरवणुकीची शोभा
पारंपरिक देखाव्यांचे उत्तम सादरीकरण चित्ररथ मिरवणुकीची शोभा वाढवून गेले. जास्तीत जास्त मंडळांनी देखाव्यांवर भर दिला होता. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापण्याच्या कार्यातील महत्त्वाचे प्रसंग देखाव्यांद्वारे मांडण्याची पद्धत बेळगावकर अनेक वर्षे जपत आले आहेत. छत्रपती शिवरायांचे शौर्य आणि धैर्य यांचे महत्त्व अधोरेखीत करणारे देखावे महत्त्वाचे ठरले.
यामुळेच बेळगावच्या शिवजयंती उत्सवाला आणि विशेषतः चित्ररथ मिरवणुकीला आगळे स्वरूप प्राप्त झाले आहे. यंदाही याचेच चित्रण पहावयास मिळाले.
मिरवणूक मार्गांवर प्रचंड गर्दी
मिरवणूक पाहण्यासाठी बेळगाव शहर परिसर, उपनगरी भाग तसेच बाहेर गावचे शिवप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने दाखल झाले होते. नरगुंदकर भावे चौकापासून कॉलेज रोडपर्यंतच्या मिरवणुकीच्या मार्गावर शिवप्रेमींची प्रचंड गर्दी झाली होती. मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली आणि कॉलेज रोड परिसरात रस्त्याच्या दुतर्फा तुडुंब गर्दी झाली. मागील दोन वर्षांत झालेला हिरमोड शिवभक्तांनी यावषीच्या मिरवणुकीतून भरून काढला.
बालचमू, युवावर्ग, महिला, युवती आणि सारेच चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी दाखल झाले होते. बेळगाव तालुका, खानापूर, चिकोडी, निपाणीसह कोकण आणि गोव्याचे शिवप्रेमीही मोठय़ा संख्येने दाखल झाले होते. सायंकाळी 6 वाजता मिरवणूक सुरू होणार असे जाहीर केल्याने नागरिक 5.30 वाजल्यापासूनच मिरवणुकीच्या मार्गावर दाखल झाले होते. मात्र मुख्य मिरवणूक 6.30 वाजता सुरू झाली. यानंतर चित्ररथ दाखल होण्यास सुरुवात झाली. देखावे सादर करीत चित्ररथ हळूहळू पुढे सरकत होते. यामुळे नागरिकांना काहीकाळ ताटकळावे लागत होते.
गॅलरी नसल्याने गैरसोय
मनपाच्यावतीने दरवषी धर्मवीर संभाजी चौक येथे शिवभक्तांना बसण्यासाठी गॅलरीची सोय करण्यात येते. यामुळे महिला, वयोवृद्ध व लहान मुलांना चित्ररथ मिरवणूक पाहणे सोयीचे ठरते. परंतु यावषी महानगरपालिकेला गॅलरीचा विसर पडल्याने शिवभक्तांची गैरसोय झाली. महिला व लहान मुलांना कॉलेज रोड येथील दुभाजकावर उभे राहून मिरवणूक पहावी लागली. यावषी गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी होत होती. महानगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे शिवभक्तांतून नाराजी व्यक्त करण्यात आली.
मिरवणुकीत जाणवला विस्कळीतपणा
चित्ररथ मिरवणुकीत शिस्तबद्धरित्या देखावे सादर व्हावे, यासाठी पोलीस प्रशासन, मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ, चित्ररथ महामंडळ प्रयत्नशील होते. परंतु मिरवणुकीत इतर गल्ल्यांमधून काही मंडळांनी शिरकाव केल्यामुळे मिरवणुकीमध्ये विस्कळीतपणा जाणवला. काही मंडळांनी बुधवारी सकाळपासून चित्ररथ ट्रॉली आणून ठेवली होती. परंतु प्रत्यक्षात रात्री 9 नंतर कलाकार चित्ररथावर दाखल झाले. यामुळे मागील चित्ररथांना पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाला. विस्कळीतपणा जाणवल्याने शिवभक्तांनाही देखावे पाहण्यासाठी परिश्रम घ्यावे लागत होते.
लहान विपेत्यांना मिळाला रोजगार
शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसाठी हजारो नागरिक शहरात दाखल होत असल्याने लहान विपेत्यांना रोजगार मिळतो. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे लहान विपेते अडचणीत आले होते. सण-समारंभांना निर्बंध आल्यामुळे आर्थिक कुऱहाडच कोसळली होती. यंदाच्या चित्ररथ मिरवणुकीमुळे लहान विपेत्यांना पुन्हा रोजगार मिळाला. पाण्याच्या बाटल्या, शेंगदाणे, वाटाणे, भडंग, वडापाव, भजी, पोहे, उप्पीट, आईस्क्रीम यासह इतर साहित्य विक्री तेजीत होती. बऱयाच दिवसांनी व्यवसाय झाल्याने विपेत्यांचे चेहरे आनंदले होते.
प्रत्येक मंडळाचे कमालीचे परिश्रम
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने निर्माण केलेली अनारोग्याची काळजी या मिरवणुकीने पार पुसून टाकली. दोन वर्षे शिवप्रेमींच्या उत्साहावर कोरोनाने विरजण घातले होते. मात्र यंदा कोरोनामुक्त वातावरणात मिरवणूक निघाली आणि प्रत्येक शिवजयंती उत्सव मंडळाने यासाठी कमालीचे परिश्रम घेतल्याचे प्रकर्षाने जाणवले.
विजेच्या खेळखंडोब्याने मिरवणुकीत व्यत्यय
विजेचा खेळखंडोबा हा बेळगावकरांसाठी काही नवीन नाही. परंतु हजारोंच्या संख्येने शिवभक्त जमले असताना हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे रात्री 12 च्या सुमारास समादेवी गल्ली परिसरात अचानक वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे एकच गोंधळ उडाला. मंडळांनी लावलेल्या जनरेटरच्या आधारे चित्ररथ पुढे सरकत होते. परंतु मोठय़ा प्रमाणात गर्दी झाल्याने ती नियंत्रणात आणणे कठीण होते. हेस्कॉमच्या या गलथान कारभारामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
मध्यरात्रीनंतरही दणदणाट अन् जल्लोष! : संवेदनशील भागांवर पोलिसांची नजर
कोरोना महामारीच्या कहरामुळे तब्बल दोन वर्षे शिवजयंती मिरवणूक झाली नाही. यंदा कोरोना आटोक्मयात आल्यामुळे चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी शिवभक्तांची अलोट गर्दी जमली होती. मध्यरात्रीनंतरही डीजेचा दणदणाट व शिवभक्तांचा जल्लोष सुरूच होता.
संवेदनशील भागांतील घडामोडींवर पोलिसांनी नजर ठेवली होती. स्वतः पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी शहराचा फेरफटका सुरू ठेवला होता. आझमनगर, शहापूर व शहरातील मध्यवर्ती भागातही त्यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच अधिकाऱयांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या.
मिरवणूक मार्गावरील उंच इमारतींवर पोलीस तैनात केले होते. इमारतींवरून पहारा देणाऱया पोलिसांच्या हातात लाल बल्ब झळकत होते. मिरवणूक पाहणाऱयांना आपण उंचावर बसून तुमच्यावर नजर ठेवत आहोत, हे दाखविण्याचाच प्रयत्न पोलीस करीत होते. ड्रोन कॅमेऱयांच्या माध्यमातून मिरवणुकीवर नजर ठेवण्यात येत होती. खासकरून प्रत्येक गल्लीबोळात पोलिसांची गस्त ठेवण्यात आली होती.